Skip to content Skip to footer

कथाविलास

Rs.200.00

Publisher : APK Publishers
Author : विलास गोरे
Number of Pages : 176
Size : 21.59 x 13.97 x 1 cm

Description

विलासने केवळ कथाच लिहिलेल्या नाहीत तर सिंहगड-रायगड ट्रेकचा अनुभव, अंदमान सहल, बाराटांग, सेल्युलर जेल, रॉस आयलंड ही प्रवास वर्णनं आणि त्याच्या आजी-आजोबांची व्यक्तिचित्रणे सुद्धा छान लिहिली आहेत. याखेरीज सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंगच्या “कथास्तू” या सदरात या कथासंग्रहातली “निर्णय” नावाची त्याची कथा आधीच प्रकाशित केली आहे. तसंच “कथा एका अनवट वास्तूची” ही १४ भागांची कथामालिका किंवा दीर्घकथा म्हणूया आणि “पूर्णविराम” नावाची ८८ भागांची कथामालिका (serial) लिहिण्याचा पराक्रम प्रतिलिपी वर केलाय. त्याच्या “मोहजाल” आणि “असा मिळाला न्याय” या दोन कथांना बक्षीसही मिळालेत. विलासने त्याच्या जिव्हाळ्याच्या शेअर बाजारावर काही लेख लिहीले आहेत आणि ओ.पी. नय्यर, मदनमोहन, रवि अशा हिंदी चित्रपट संगीतकारांवर अभ्यासपूर्ण लेखही लिहिलेत. त्याच्या हातून अशाच उत्तमोत्तम साहित्य कृती होऊ देत आणि त्यासाठी त्याला खूप शुभेच्छा!!

कथाविलास
Rs.200.00