Description
मी आयुष्यात कुठल्या दिशेने चाललो आहे? मला आयुष्यात काय मिळवायचे आहे? सर्व भौतिक सुख, यश, असूनही मी खुश नाही. माझ्या मनात कायम एक पोकळी आहे जी कशानेही भरून निघत नाही. मी करिअर, पैसा, प्रेम, प्रॉपर्टी, सुखसुविधा, इत्यादी सगळ्या प्रकारे हे पोकळी भरून खढण्याचा प्रयत्न केला, पण तरीही एक शून्यता, रिक्तता कायम राहतेच. माझ्या आयुष्यात असे काय आहे जे साध्य करायचे राहिले आहे आणि ते साध्य केल्यावर खरंच हे पोकळी भरून निघेल का? माझ्या मनातील हे अंतर द्वंद्व कधीतरी शांत होईल का?” हे आणि असे अनेक प्रश्न, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, हळूहळू, त्याला त्याच्या आयुष्यातील, अस्तित्वातील सर्वात प्राचीन पण अत्यंत नवीन अशा एकाच प्रश्नाकडे घेऊन गेले. तो प्रश्न म्हणजे,
“कोण आहे मी?”
इतक्यात, पहिल्यांदाच, ‘ती’ त्याच्या मनात हळूच कुजबुजली, “चल शोधूया, तू कोण आहेस ते…!
तू बाहेर सगळीकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलास. सगळे मार्ग पडताळून पाहिलेस. ओळखी अनोळखी सर्वांचे मत व विचार जाणून घेतले, तरीही तुला तुझे उत्तर सापडले नाही. पण, अजूनही एक मार्ग शेष आहे जिथे तुला तुझे उत्तर नक्कीच सापडेल.
तो मार्ग म्हणजे स्वतःच्या मनात, अंतरात, स्वस्वरूपाचे ज्ञान शोधणे, विकसित करणे आणि कोण आहे मी? हे अनुभवाने जाणून घेणे होय. जसा बीजामध्ये वृक्ष लपलेला असतो अगदी तसेच प्रत्येक प्रश्नात त्याच्या उत्तराचे बीज दडलेले असते. आपण तुझ्याच अंतर्मनात उत्तर शोधूया.
बोल, आहे का तुझी तयारी स्वतःला स्वतःमध्ये शोधण्याची?”
अशा प्रकारे एका अज्ञात, अनपेक्षित, आकस्मिक, अनाकलनीय आणि अत्यंत गूढ अशा अंतर प्रवासाला सुरूवात झाली.
Reviews
There are no reviews yet.